डीआरडीओ  प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना  कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा : रविंद्र भेगडे
तळेगाव दाभाडे :  जिल्हा न्यायालयाने तळेगाव दाभाडे व शेलारवाडी मधील भूमिपुत्रांच्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यापश्चात , DRDO प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा असे आदेश पारित केले. डीआरडीओ  प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना  कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर  मोहोळ यांच्या कडे केली.  मोहोळ यांनी या बाबतीत  मध्यस्थी करावी अशी मागणी   भेगडे यांनी केली.                                                                 न्यायालयाच्या  आदेशानुसार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने , निकालाविरोधात वरीष्ठ न्यायालयात दाद न मागता संरक्षण विभागाने जिल्हा न्यायालयच्या निकालाचा उचित सन्मान करून , शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात येण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी व त्यासंबंधी शिफारस करावी अशी मागणी रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज पुणे येथे सदर निवेदन मंत्रोमहोदयांना देण्यात आले. याप्रसंगी मावळ भाजपा संघटन मंत्री .संतोष राक्षे  उपस्थित होते.

error: Content is protected !!