पिंपरी:
पिंपरी चिंचवड महापालिके मार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने, पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांची सभा महापालिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती.
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींनी या सभेला उपस्थिती दर्शविली. गणेशोत्सव आणि आगामी नवरात्र उत्सव साजरा करताना पर्यावरण पूरक मूर्ती आणि पूजा साहित्य अवलंबण्याचा आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.
सर्व संस्था प्रतिनिधींनी आपापल्या सूचना या सभेमध्ये मांडल्या . यावेळी संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे विविध सूचना आणि अडचणी संदर्भात निवेदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि सचिव आनंद पाथरे यांच्या वतीने प्रशासक शेखर सिंह यांचे कडे देण्यात आले.वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये झालेल्या सभेमध्ये आगामी गणेशोत्सव आणि नवरात्र पर्यावरणपुरक साजरा करण्या दृष्टीने निर्धार करण्यात आला.आणि सभेची सांगता झाली.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम