लोणावळा: राज्यात व देशभरात शालेय विद्यार्थी यांचेवर होत असलेल्या अत्याचाराचे घटनांमध्ये वाढत होताना दिसुन येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे सुरक्षेसाठी लोणावळा विभागातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत, वडगाव मावळ पोस्टे हद्दीतील शाळा, कॉलेज मधील मुख्याधिकारी, प्राचार्य, मॅनेजमेंट, महिला शिक्षिका, पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन विद्यार्थी/विद्यार्थीनी यांचे सुरक्षेबाबत काही महत्वाच्या सुचना दिलेल्या आहेत.
शाळा, कॉलेज परीसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, त्याचे मॉनिटरिंग करणे, शाळा, कॉलेजमध्ये तक्रार पेटी सुरक्षित ठिकाणी बसवुन ती नियमित उघडुन त्यातील तक्रारींचे निवारण करणे, शाळा, कॉलेज परीसरातील ग्रे एरिया मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विद्यार्थी सुरक्षा समिती व समुपदेशन कक्षाची स्थापना करणे , प्रवेशव्दार, बाहेर पडण्याचे गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे, पीए सिस्टीम बसवुन त्याव्दारे सुचना देणे, पोलीस दादा, पोलीस दिदी, निर्भया पथक, पोलीस पेट्रोलींग याव्दारे शाळा, कॉलेज येथे भेटी देऊन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे सुरक्षेचा नियमित आढावा घेणे. महिला दक्षता समिती स्थापन करून त्यांचे मार्फतीने विद्यार्थीनीचे समस्या जाणुन घेवुन कार्यवाही करणे.शाळा, कॉलेज मधील सर्व स्टाफ, वॉर्डन, सफाईकामगार, बस ड्रायव्हर, सुरक्षारक्षक यांचे चारीत्र पडताळणी करून घेणे.शाळा कॉलेज परीसरातील पानटपरी, दुकाने यांची चेकींग करणे, शाळा कॉलेज परीसरात पोलीस पेट्रोलींग करणे.शाळा, कॉलेज प्रवेशव्दार व बाहेर पडण्याचे ठिकाणी बाहेरील इसमांची व संशयित व्यक्तीची चेकींग करणे, शाळा, कॉलेज मध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्याव्दारे सीसीटीव्हीव्दारे संपुर्ण परीसरावर नियंत्रण ठेवणे,शाळा, कॉलेज परीसरात वाढत चाललेले अमली पदार्थाचे सेवनाबाबत संकल्प नशामुक्ती अभियानाव्दारे विद्यार्थीमध्ये जागृती करून त्यांचे समुपदेशन करणे. अशा विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करून पोलीस स्टेशन निहाय प्रत्येक शाळा, कॉलेजकरीता पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नियुक्ती करून शाळा, कॉलेज येथे पोलीस पेट्रोलींग करून अशा दुर्देवी घटना घडणार नाहीत याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.