

वडगाव मावळ: मावळ तालुक्याच्या दुर्गम भागातील डोंगरवाडी ते सटवाईवाडी या रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी सटवाईवाडीच्या लाडक्या बहिणींनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या कडे केली आहे. या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने सटवाईवाडीकरांना पायपीट करीत सहयाद्रीच्या पठारावरून खाली यावे लागत असल्याचे येथील महिलांनी आमदार शेळके यांच्या निदर्शनास आणून दिले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात सटवाईवाडीच्या महिलांनी आपली कैफियत आमदार शेळके यांच्याकडे मांडली. या आशयाचे लेखी निवेदन देऊन गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाकडे या सुवासिनींनी लक्ष वेधले रुग्ण, वयोवृद्ध गावकरी यांना झोळीत टाकून आणावे लागते. विद्यार्थी पायपीट करीत ये जा करीत असल्याचे महिलांनी सांगितले.
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शाहुराज साबळे यांना डॉक्टरेट
- कामशेत येथे महिला कार्यगौरव सोहळा संपन्न
- रमजान ईद निमित्त इंदोरीत खजूर वाटप : प्रशांत भागवत युवा मंचाचा उपक्रम
- संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा – आमदार सुनील शेळके
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात गुढीपाडवा व मराठी नववर्षाचं स्वागत भव्य शोभायात्रेने जल्लोषात साजरं!!



