बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी विजय टाकवे कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड ;सचिव नवनाथ शेटे

कामशेत: मावळ-मुळशी-हवेली तालुका बैलगाडा छकडी संघटनेच्या अध्यक्षपदी करंजगावचे विजय शिवाजी टाकवे यांची बिनविरोध निवड झाली. 

बैलगाडा मालक संघटनेच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच बैलगाडा छकडी संघटनेच्या कार्याधक्षपदी सुरेश गायकवाड  व संदीप आंद्रे तर सचिवपदी नवनाथ शेटे, सह-सचिव रंगनाथ सावंत यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारणीमधे उपाधक्ष पदी देवराम गायकवाड,नवनाथ पडवळ,प्रविण घरदाळे व सनी हुलावळे तर खजिनदार स्वप्निल तरस व सचिन काजळे यांची सह-खजिनदार  म्हणून नेमणूक करण्यात आली.

संघटनेच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीला पारंपारिकता जपत डिजिटल संकल्पनेतून ग्लोबल रुप देण्याचा संकल्प संघटनेचा वतीने संकल्प करण्यात आला.

error: Content is protected !!