वडगाव मावळ: ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सुविधेसाठी साते जवळच्या ब्राम्हणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टिव्ही संच भेट देण्यात आला.पिंपळे निलखच्था मैत्री आधार संस्थेच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली.
ब्राम्हणवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १६५ मुल व मुलीना उच्च ज्ञान अवगत होणेकामी शाळेतील शिक्षकाच्या मागणीनुसार मैत्री आधार संस्थेच्या मदतीने शाळेस ४३ इंची स्मार्ट टेलिव्हिजन देवून मुलीच्या व मुलाच्या शिक्षणासाठी एक मदतीचा हात दिला तयाकामी
भरत इंगवले ह्यानी पुढाकार घेवून या मदतीसाठी मैत्री संस्थेचे सदस्य व सामाजिक कार्यकर्त राजेंद्र टकले,संदीप लक्षमण कामठे जयवंत रानवडे,सचिन कणसे, प्रमोद दळवी,पुरुषोत्तम गायकवाड, बाळासाहेब धरपळे व संदीप बबनराव साठे यांनी मोलाची मदत केली.
मैत्री आधार संस्थेच्या वतीने दर महिन्याला समाजातील गोरगरीब घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य केले जाणार आहे याची ग्वाही राजेंद्र टकले व भरत इंगवले यांनी दिली.
शाळेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी समारंभात शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत दूरसंचार देण्यात आला. शिक्षक विद्यार्थी व मैत्री आधार संस्थेचे सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.
शाळेचे प्राचार्य पवार यांनी प्रास्ताविकातून या परिसरातील शैक्षणिक व भौगोलिक परिस्थितीचा आढावा सांगितला.
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन
- संक्रातीच्या निमित्ताने प्रशांत भागवत मित्र परिवाराच्या वतीने तिळगुळाचे वाटप