तळेगाव दाभाडे:मसाप मावळ शाखेचा वाचन कट्टा येथील संजीवनी मुलींच्या वसतिगृहात पार पडला. यात अनेक साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा अतिशय उत्तम पणे मागोवा घेण्यात आला. 

या वाचन कट्ट्यात सुरुवातीला संजीवनी वसतिगृहातील नम्रता शेडगे (इयत्ता आठवी) हिने शोधा शोध नावाची नाट्यछटा अभिवाचित केली.

 तसेच हर्षल आल्पे आणि योगंधरा बढे यांनी श्रीकृष्ण पुरंदरे लिखित ‘सुखी जीवनाभोवती’ही नाटिका अभिवाचित केली. यानंतर पुरंदरे यांनी मधु मंगेश कर्णिक,प्रकाश गोळे  यांच्या कथांचे अभिवाचन केले. 

विशेष उल्लेख हर्षल आल्पे यांनी अभिवाचित केलेल्या व्यंकटेश माडगूळकर लिखित वारी या कथेला मान्यवरांनी आणि रसिकांनी भरभरून दाद दिली. 

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते सुधाकर देशमुख तसेच सौ उर्मिला बासरकर अमित बांदल, संकेत बनसोडे आणि रंजना मुंगीकर, ज्योती वैद्य, आणि  सामाजिक कार्यकर्ते संग्राम जगताप यांची विशेष उपस्थिती होती. 

यावेळी श्री सुधाकर देशमुख यांनी या वाचन कट्ट्याचे तसेच या संजीवनी वसतिगृहाचे तोंड भरून कौतुक केले. तर संग्राम जगताप यांनी या वसतीगृहास सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर आश्वासन दिले.संजीवनी वसतिगृहाच्या संचालिका आसावरी बुधकर यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.

error: Content is protected !!