लोकन्यायालयात मोठ्या संख्येने खटले निकाली
पिंपरी :पिंपरी – चिंचवड न्यायालय, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण आणि पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोशिएशन यांच्या विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी, नेहरूनगर न्यायालयात २६७ खटले निकाली काढण्यात आले. त्यामुळे २,०३,३४,८२५ रुपये किमतीचे दावे निकाली निघाले.
तर आकुर्डी पी सी एम सी न्यायालय येथे ३२४ खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये ९७,६२,८२१ रुपये महसूल जमा झाला; तसेच वाहतूक चलनच्या प्रकरणात १,०३,८०० रुपये दंड जमा झाला. यामध्ये पिंपरी, नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. चव्हाण, एल. ए. के. एमुदी, बी.डी. चौखट आणि आकुर्डी न्यायालयात वी. एस. डामरे यांनी कामकाज पाहिले.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून तसेच पाहुण्याचे स्वागत करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर होते; तर ॲड. संगीता परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते यांची भाषणे झाली. त्यांत पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर यांनी मार्गदर्शन केले. एल. ए. के. एमुदी यांनी लोकन्यायालयात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. ॲड. सुहास पडवळ, ॲड. सतीश गोरडे यांनी लोकन्यायालयाची आवश्यकता, त्याची स्थापना आणि भविष्यात त्याचे महत्त्व पटवून सांगितले; तर ॲड. सुशील मंचरकर यांनी लोकन्यायालयाची संकल्पना, त्याचा इतिहास रामायण आणि महाभारत याचा संदर्भ देत भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान यांची उदाहरणे उद्धृत करीत उपस्थितांना सामंजस्याने वाद कसे मिटवता येतील याचे मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमात दि पुणे लॅायर्स कंझ्युमर्स को. ॲाप. सोसायटी लिमिटेड नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालकपदी ॲड. राजेश पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनद्वारे सत्कार करण्यात आला. त्यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. मदनलाल छाजेड, माजी उपाध्यक्ष ॲड. अतुल अडसरे, ॲड. गौरव वाळुंज, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुजाता बीडकर, ॲड. मोनिका गाढवे आणि पिंपरी – चिंचवड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, एस. एन. बी. पी. कॅालेजचे विद्यार्थी, नागरिक आणि मोठ्या प्रमाणात वकील बांधव उपस्थित होते.
पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲड. अनिकेत खिलनानी, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. संघर्ष सूर्यवंशी आणि ॲड. मानसी उदासी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. फारुख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. मीनल दर्शले यांनी केले. ॲड. धनंजय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. फारुख शेख यांनी आभार मानले.