भोसरी, इंद्रायणीनगर :श्री.टागोर शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर व श्री टागोर माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढीवारी निमित्त पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग व ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या नादावर ठेका धरला होता तर मुलींनी डोक्यावर तुळस घेऊन वारीत दंग झाले होते.हे सर्व दृश्य म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग ! आनंदाचे अंग आनंदीही याचा प्रत्यय येत होता.
संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार लांडे पाटील व संस्थेचे सचिव सुरेश फलके उपाध्यक्ष महेश घावटे, सुरज लांडे स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज लांडे त्याचबरोबर युवा नेते युवराज बापू लांडे पाटील उपस्थित होते.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हनुमंत आगे व संतोष काळे ज्येष्ठ लिपिक दिलीप पाटील ,आदर्श शिक्षक शशिकांत ताटे व संतोष सुलाखे उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारली होती.
टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर शाळेतील विद्यार्थ्यांनी नामघोष व फुगडी घातली लहान चिमुकल्या बालकांनी तर गोल रिंगण देखील केले.या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख माया पाटोळे, सोनवणे मनीषा यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस