वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मेधा सोनावणे (निकम) यांना इंग्लंड मधील रेडिंग युनिव्हर्सिटी मधुन ‘ सर्प विषामुळे होणारे स्नायुंचे नुकसान आणि त्या वरील उपाय ‘ या विषयावर पी. एच. डी. पदवी मिळाली असून त्यांच्या या यशस्वी कामगिरीचे कौतुक होत आहे.
तळेगाव शहरातील दत्तात्रय सोनावणे यांच्या कन्या मेधा सोनवणे यांनी अनेक वर्ष सर्प मित्र म्हणून काम केले आहे. पु. वा.परांजपे विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पनवेल येथे पुढील शिक्षण पूर्ण केले असून इंग्लंड मधील रेडिंग युनिव्हर्सिटी मध्ये पी.एच. डी पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी याआधीचे सर्प दंशावरील संशोधनातून तीन पेटंट मिळवले आहेत.
या यशस्वी कामगिरीमध्ये आई – वडील, बहिणी, पती ऋषिकेश निकम व मुलगी ह्रिज्ञा निकम यांनी मोलाची साथ दिली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. एका अनोख्या विषयामध्ये संशोधन करत पी.एच. डी. मिळवल्याने सोनवणे यांचे तळेगाव शहरासह मावळ तालुक्यात विशेष कौतुक होत आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस