पिंपरी:नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३१व्या श्रावणी काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक कवींनी ३१ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आपल्या कविता पाठवाव्या, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले आहे.

सदर काव्यस्पर्धेत काव्यलेखनासह प्रत्यक्ष सादरीकरणाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून कवितेला विषयाचे बंधन नाही. कविता वीस ओळींपेक्षा दीर्घ असू नये. कवितेच्या आधी ‘नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्यस्पर्धा ३१’ असा उल्लेख करून शीर्षक, कविता, कवीचे संपूर्ण नाव, परिसर आणि संपर्क क्रमांक नमूद करावा.

 कवितेतून कोणत्याही प्रकारची राजकीय, सामाजिक, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. पारितोषिकप्राप्त कवींना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. 

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. कविता व्हॉट्सॲपवर टाईप करून नवयुग सहसचिव अश्विनी कुलकर्णी यांना ९२२६१२५९४९ या व्हॉट्सॲप क्रमांकावरच पाठवावी. कागदावर लिहून त्याचा फोटो काढलेल्या कविता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. मुदतीत पाठवलेल्या कविता स्पर्धेसाठी पात्र ठरतील. श्रावणी काव्यस्पर्धा ११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ठीक ०३:०० वाजता पिंपरी  – चिंचवड परिसरात आयोजित करण्यात येणार असून कार्यक्रमाचे स्थळ स्पर्धकांना आठ दिवस आधी कळविण्यात येईल.

 अधिक माहितीसाठी उपाध्यक्ष राजेंद्र घावटे (भ्रमणध्वनी – ८८८८४३४३३१ अथवा संचालक माधुरी विधाटे (भ्रमणध्वनी – ७५८८३२८४६९) यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!