प्राधिकरण, निगडी: प्रा.जे.नागरिक संघातर्फे इयत्ता 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 12 जुलै 2024 रोजी दादा दादी उद्यानात साजरा करण्यात आला.
दीप प्रज्वलन अर्चना वर्टीकर व सय्यद मॅडम,तसेच मान्यवरांच्या हस्ते झाले. ईशस्तवन दुर्गेश्वराच्या संघाने सादर केले.अध्यक्ष महाजन यांनी प्रास्ताविक केले तर सोनगीरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
लायन्स क्लबच्या अध्यक्षा मनीषा गायकवाड यांचा सत्कार अध्यक्ष महाजन सर, सेक्रेटरी रश्मी नायर यांचा सत्कार मुळूक सर,खजिनदार वृषाली सुरवडे यांचा सत्कार वैद्य सर यांनी केला.आपल्या मदतीसाठी सतत धावून येणारे सलीम शिकलगार यांचा सत्कार डॉ सुशीला म्हेत्रे यांनी केला. प्रमुख पाहुणे श्री विजय बहाळकर यांचा सत्कार अध्यक्ष महाजन सरांनी केला.
लायन्स क्लब अध्यक्षा मनीषा गायकवाड तसेच श्री शिकलगार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत व वैशाली भांडारकर यांनी दिलेल्या देणगी मधून दोन होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार श्री व सौ भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे वाचन श्री चंद्रशेखर जोशी, शाम खवले यांनी केले. सभासदांच्या नातवंडांचा सत्काराचे वाचन सौ अलका बेल्हेकर वर सौ रजनी जैन यांनी केले.
उपस्थित पालकापैकी व विद्यार्थ्यांपैकी दोघांनी तसेच शिक्षकांनी मनोगत सादर केले.आभार डॉ,म्हेत्रे यांनी मानले.खाऊ वाटप अशोक विरकर,काशिनाथ पाटील,वसंतराव पाटील,वसंतराव पाटील,संकलेच्या,सौ सुनंदा कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा कोळपकर यांनी केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस