पिंपरी:
मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, भाजपा ,राष्ट्रवादी काँग्रेस ,आर. पी. आय,रासप – मनसे, एस आर पी व घटक पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे सोमवार, दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
मोठे शक्तिप्रदर्शन करीत बारणे उमेदवारी अर्ज भरतील. मागील दोन टर्मला बारणे यांनी मावळ लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.तिस-यांदा विजयाची हॅटट्रिक करण्याचा विश्वास बारणे समर्थक व महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.
सोमवारी बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खंडोबामाळ चौक ते पीएमआरडी ऑफिस प्राधिकरण येथे शक्ती प्रदर्शन आणि अर्ज दाखल करण्यासाठीं उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.