पंचवीस हजारांची लाच घेताना तलाठी अटकेत
वडगाव मावळ :
सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना मावळ तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. सखाराम कुशाबा दगडे (वय ५२, तलाठी, सजा करूंज, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयामागील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सोमवारी (दि.१८) रा ही कारवाई करण्यात आली.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी आरोपी दगडे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना दगडे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागात खळबळ उडाली दरम्यान, तलाठी दगडे यांच्यावर झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे विशेषतः महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुक्यात महसूल, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख अशा सर्वच विभागात बहुतांश अधिकारी, कर्मचारी पैशाशिवाय कामच करत नाही, त्यामुळे तालुक्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले असून, यावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय काजळे यांनी  व्यक्त केले.

error: Content is protected !!