वडगाव मावळ:
येथील शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनंता कुडे , कार्याध्यक्ष पदी खंडूशेठ भिलारे तर कार्यक्रम प्रमुख अतिश ढोरे व दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली.
शहरात साजरी होणा-या शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी या वर्षीची कार्यकारणी जाहीर केली,शिवजयंती उत्सवाचे यंदाचे ४५वे वर्ष आहे.
या वर्षी शिवजयंती उत्सव समिती च्या अध्यक्ष पदी अनंता बाळासाहेब कुडे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणीत कार्याध्यक्ष पदी खंडूशेठ भिलारे,कार्यक्रमप्रमुख पदीअतिश ढोरे व दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष पदी महेंद्र म्हाळसकर,संतोष भालेराव, अनिल ओव्हाळ, सागर मराठे,खजिनदार पदी अतुल म्हाळसकर सहखजिनदार पदी गणेश भिलारे, गणेश गवारे,सचिव पदी कुलदीप ढोरे, सहसचिव पदी समीर गुरव,विकी म्हाळसकर, गणेश वहिले यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी पोटोबा देवस्थानचे विश्वस्त नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,विश्वस्त किरण भिलारे,सोमनाथ काळे,माजी उपसरपंच संभाजी म्हाळसकर, माजी अध्यक्ष दिनेश ढोरे, दिलीप चव्हाण, दिपक कुडे,गणेश हिंगे, माजी नगरसेवक किरण म्हाळसकर, अँड. विजय जाधव, प्रसाद पिंगळे, रविंद्र म्हाळसकर,शंकर भोंडवे,दिपक भालेराव कल्पेश भोंडवे आदिसह शिवजयंती उत्सव समिती आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.