दिल्ली:
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील जनता मतदानाच्या तारखांची आतुरतेने वाट पाहत आहे.लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे.केंद्रीय निवडणूक आयुक्त शनिवार १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करणार आहेत. त्याचवेळी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे.
आयोगाची आज पत्रकार परिषद आहे.देशभरातील लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नावीन्यपूर्ण घोषणा होणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
ही प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या होणार आहे. आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जम्मू-कश्मीरमध्येही विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम