मुंबई:
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ.मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली.शुक्रवार दिनांक २३फेब्रुवारीला पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या ८६ व्या वर्षी देवाज्ञा झाली.
बुधवार ता.दिनांक २१फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष जोशी यांच्यावर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे २०२३ मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान