भोयरे येथे आठवडे बाजाराचे उद्घाटन
टाकवे बुद्रुक:
कांदा घ्या..भाजी घ्या..कोथिंबीर घ्या.. ओ  दादा.. वांगी ,बटाटा, मेथी स्वस्तात लावली घ्या या आरोळीने आंदर मावळातील भोयरे गाव गजबजून गेले.
निमित्त होते आठवडेबाजार सुरू करण्याचे. गावातच ताजी आणि स्वच्छ भाजी मिळणार असल्याने गावातील गृहाणीचा वेळ,पैसे आणि श्रम वाचणार आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भोयरे गावात  आठवडे बाजार सुरू होत आहे.सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांच्या प्रयत्नातून आठवडे  बाजार सुरू करण्यात आला आहे.
आज भरलेल्या  आठवडे बाजारात भाजीपालासह अन्य जिन्नस महिलांनी खरेदी केल्या.
या उद्घाटन सोहळ्यास सरपंच भोईरकर यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला आता थेट ग्राहकांच्या दारापर्यंत जाणार आहे.
आज भरलेल्या  आठवडे बाजारात भाजीपाल्यासह इतर वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली.
स्थानिकांसह परिसरातील गावातील नागरिकांना पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करावी लागत होती. गावात आठवडे बाजार सुरू झाल्याने त्रास आणि वेळ वाचणार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह स्थानिकांनी स्वागत केले.
  सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांनी एक वर्षांपूर्वी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गृहिणी स्थानिक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण गावातच आठवडे बाजार भरावा यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतला.
त्या अनुषंगाने परिसरातील आंबळे ते सावळा या दरम्यानच्या सुमारास वीस ते पंचवीस याचा लाभ होणार आहे.या सर्व गावात लाऊड स्पीक च्या माध्यमातून दर शनिवारी आठवडे बाजार भोयरे या ठिकाणी भरणार असल्याबाबत दवंडी देण्यात आली. त्यामुळे गाव व परिसरातील भाजीपाला उत्पादक ,किराणा, भेळ भत्ता विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती .प्रथमच गावात बाजार यशस्वीरित्या झाल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. या आठवड्या बाजाराचे उद्घाटन मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव  म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम  कदम ,पंचक्रोशीतील सर्व गावचे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन ,व्हाईस चेअरमन व सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ  मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

error: Content is protected !!