वडगाव मावळ:  शहरात प्रथमच मोरया महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून शहरातील महिलांसाठी टू व्हिलर प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
मोरया महिला प्रतिष्ठान च्या वतीने वडगाव कातवीतील महिला भगिनींसाठी.. टू व्हिलर प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ माजी  नगराध्यक्ष मयूर ढोरे, अबोली ढोरे, माजी नगरसेविका पुनम जाधव, संचालिका सुषमा जाजू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
टू व्हीलर प्रशिक्षण सरावास शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी पासून सलग दहा दिवस दररोज सकाळी ९ ते ५ या वेळेत हाॅटेल अक्षय पॅलेस जवळील मैदानात सुरुवात होणार आहे. शहरातील महिला प्रशिक्षणार्थी यांना पुढील दहा दिवसांत अतिशय अल्पदरात महिला प्रशिक्षका टू व्हीलर ट्रेनिंग देणार आहेत. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स सुद्धा काढून देण्यात येणार आहे. यासाठी वडगाव शहरातील महाराजा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
वडगाव शहरात प्रथमच महिलांसाठी होत असलेल्या टू व्हिलर प्रशिक्षणात सुमारे २०० हून अधिक महिला प्रशिक्षणार्थींनी मोरया प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयात नावनोंदणी केली आहे. यापुढील कालावधीतही हि नावनोंदणी सुरू ठेवण्यात येईल अशी माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली.
यावेळी माजी  नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, मा नगरसेविका पूनम जाधव, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, संचालिका सुषमा जाजू, कविता नखाते, जयश्री जेरातगी, नयना भोसले, प्रशिक्षक शितल जाधव, स्मिता कांबळे आदींसह प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, संचालिका आणि महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!