तळेगाव दाभाडे:
शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक यांनी  आपल्या  विद्यार्थ्यांच्या  गुणवत्ता वाढी साठी  विशेष  प्रयत्न   केले  पाहिजे असे प्रतिपादन नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे  सचिव संतोष खांडगे  यांनी  केले.
नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचेवतीने  स्पधाॅ  परिक्षा शिक्षक मार्गदर्शन  कार्यशाळेच्या समारोप समारंभात श्री  खांडगे  हे अध्यक्षपदावरून  बोलत होते. यावेळी  संस्थेचे संचालक  सोनबा गोपाळेगुरूजी,  मुख्याध्यापक  पांडुरंग पोटे, संजय  वंजारे,  सौ. वासंती काळोखे, सौ.सविता चव्हाण,   व्याख्यात्या  सौ.मनिषा  गाडे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे  उदघाटन  प्रगती  विद्या मंदिराचे  शालेय समिती चे अध्यक्ष  दामोदर शिंदे महेश शहा सोनबा गोपाळेगुरूजी   विनायक अभ्यंकर  भाऊसाहेब  आगळमे  पांडुरंग पोटे यांनी केले.
संस्थेच्या सर्व शाळामधील    शिक्षकांकरिता  राज्य व केंद्र  शासन  शिष्यवृती परिक्षेच्या  विद्यार्थाना  मागॅदशॅन  करणार्या  शिक्षकांनीकरिता  ही  कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील  शिक्षकाना मार्गदर्शक उमेश  इंगुळकर, श्रीकांत  दळवी,  मनिषा  गाडे यांनी  मार्गदर्शन केले.
        विद्यार्थी  सर्व गुण संपन्न  होण्याबरोबरच  त्याची  गुणवत्ता ही वाढली  पाहिजे असेही  श्री  खांडगे यावेळी  म्हणाले. या कायॅक्रमाचे   प्रास्ताविक  संचालक  सोनबा गोपाळेगुरूजी यांनी केले  तर आभार प्रदर्शन  मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले   श्रीमती दुर्गा  भेगडे यांनी  सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!