भारतीय जनता पार्टी मावळ वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न
लोणावळा:
भारतीय जनता पार्टी मावळ वतीने कुसगाव बुद्रुक येथे कार्यशाळा शिबीर संपन्न झाले .येथे वक्ते उत्तर जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील यांनी नवनियुक्त  पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. या वेळी पाटील म्हणाले,” “कार्यकर्ता हा समाजसेवक असला पाहिजे गावात समाजकार्यात सक्रिय असला पाहिजे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे , मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख  रविंद्र भेगडे, मावळ भाजपा अध्यक्ष दत्ता गुंड यांनी कार्यकर्ते यांना आगामी काळातील लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी व देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मावळ लोकसभा व विधानसभेवर भाजप महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी जोमाने व उत्साहाने कामाला लागण्याच्या सूचना  यावेळी केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस नितीन घोटकुले यांनी केले.
याप्रसंगी प्रभारी भास्करराव म्हाळस्कर,जेष्ठ नेते माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी राजाराम शिंदे,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी,पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रामदास गाडे,माजी उपसभापती शांताराम कदम,सुकन बाफना,लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरूण लाड,लोणावळा माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,लोणावळा उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे,महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजित नाटक,युवा वारियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे,पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष किरण राक्षे,भाजपा प्रदेश सदस्य जितेंद्र  बोत्रे,कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे,सरचिटणीस अभिमन्यू शिंदे ,सचिन येवले,अविनाश गराडे,उपाध्यक्ष विठ्ठल  घारे, राजु मुर्हे,अनुसूचित जमाती अध्यक्ष गणेश धानिवले,उपाध्यक्ष एकनाथ  पोटफोडे,ज्ञानेश्वर गुंड, सुरेश आलम,सखाराम  कडू, सीमा आहेर,सुमित्रा जाधव,कल्यानी ठाकर,संजना सातकर, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!