
वडगाव मावळ:
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त माळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळेत शिक्षिका संगिता मनोहर शिरसट यांना राज्यस्तरीय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्रसेवा समूह, रयत प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात मध्ये उल्लेखनीय कार्य तसेच सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांची निवड करण्यात आली होती.
शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक, लेखन, कला, क्रीडा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गुणगौरव करण्यात आला.तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार आणि विविध पुरस्कार मिळालेले आहे.
- आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेंद्र भोईर बिनविरोध
- मावळात राष्ट्रवादीच्या ‘गौरव महाराष्ट्र रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
- उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ – प्रा. डाॅ. राजा दीक्षित
- मराठी भाषा आंदोलक म्हणून राजन लाखे यांचा सत्कार
- भारत सरकारच्या आयुष मंत्रालय “योग प्रमाणी करण मंडळाच्या “योग तज्ञ” पदी कैवल्यधाम योग संस्थेचे सुबोध तिवारी यांची नियुक्ती





