देवाचे नाम म्हणजे दिव्य विचार
देवाचे नामस्मरण करणे म्हणजे ……
“दिव्य विचार चित्तात धारण करणे” हे होय. धारण करणे याचा सरळ अर्थ “धरून ठेवणे” हे होय .”दिव्य विचार चित्तात धरून ठेवणे”, याला खऱ्या अर्थाने नामस्मरण असे म्हणतात. म्हणून जगातील सर्व संत नामस्मरण अखंड करण्यास आवर्जून सांगतात.
“रिकामपणी नामस्मरण करण्याची संवय प्रयत्नपूर्वक साधली की काम करताना सुद्धां नामस्मरण सहज व आपोआप चालते.”
“you are a creature of your habits and habit is function of your sub-conscious mind”.*
आपण सवयींचे गुलाम आहोत व “सवय हे अंतर्मनाचे कार्य होय”.नामस्मरण अखंड करणे म्हणजे ….
“दिव्य , सुंदर व सुरेख विचार चित्तात सातत्याने धरून ठेवण्याची सवय करणे हा होय”.
असे केल्याने काय होते ?
As you think so you become.
Man is what he thinks all day long.
विचार जीवनाला आकार देतात . “जसे तुमचे विचार तसे तुमचे जीवन” हा त्रिकालबाधित सिद्धांत आहे . जीवनाचे सार्थक करण्याचे सामर्थ्य हरिनामात आहे याचे कारण हेच होय.एकनाथ महाराज कळवळ्याने सांगतात ,
आपुले कल्याण इच्छिने जयासी।
तेणे या नामासि विसंबू नये।।
तर तुकाराम महाराज आत्मविश्वासाने प्रश्न विचारतात ,
काय नव्हे केले। एका चिंतिता विठ्ठले।।
अखंड नामस्मरण करण्याची सवय करताना, ….
“देव म्हणजे सर्व सुखाचे आगर आहे, दिव्य आनंदाचा सागर आहे, दिव्य ज्ञानाचे कोठार आहे, ऐश्वर्याचे केंद्र आहे, सर्व शक्तीमान, सर्व व्यापी व दयाघन आहे”.
असे दिव्य विचार मनात, बुद्धीत , चित्तात सतत धरून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास *कांही काळाने ते नाम किंवा दिव्य विचार बहिर्मनातून अंतर्मनात घुसतात , तेथे मुरतात व परत व्यक्त होऊन त्याच प्रकारचे जीवन साकार करतात.
म्हणूनच ज्ञानदेव महाराज सांगतात —
ज्ञानदेवा रम्य रमले समाधान। हरीचे चिंतन सर्व काळ।।तुकाराम महाराज सांगतात —
अमुप जोडिल्या सुखाचिया राशी। पार या भाग्यासी न दिसे आतां।।
सद्गुरू श्री वामनराव पै
(संदर्भ ग्रंथ – अमृतमंथन)