चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहस्त्र ज्योती  प्रकाशोत्सव
एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा चैतन्याचा”
इंदोरी:
शुभं करोति कल्याणं आरोग्यम धन संपदा,शत्रु बुद्धि विनाशाय
दीपोज्योति नमोस्तुते l ही प्रार्थना म्हटली इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल येथे निमित्त होते दीपोत्सवाचे.
या शाळेत दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा चैतन्याचा” ह्या विषयाला अनुसरून चैतन्यमयी दिवाळी साजरी करण्याम्आला.संपूर्ण  परिसरात जवळ पास २००० दिव्यांची आरास करण्यात आली.
स्वस्तिक,ॐ, दीप, शंख अश्या शुभ सूचक आकारांच्या प्रतिकृति वर प्रत्येकानी एक एक दिवा लाऊन  दिवाळीचा सण साजरा केला. शाळेचे   वातावरण दीपमय आणि चैतन्यमय झाले होते. छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या प्रतापगड  किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी , पालक आणि  इतर मंडळी उपस्थित होती.कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या योग्य व्यवस्थापना मुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. शेवटी फराळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!