वडगाव मावळ :
महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशन  राज्यातील  ग्रामपंचायतीकडून  आकारण्यात  आलेल्या  अवास्तव “करपट्टी “विरुध्द   तसेच  वीजबीलाविरुद्ध  न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.
      महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे  संस्थापक अध्यक्ष अनिल खामकर आणी सचिव  विलास साळवी  यांचे मागॅदशॅनाखाली  कार्याध्यक्ष  सर्जेराव भोसले  शरद गोडांबे   सुभाष केदारी  राज्य  संघटक सोनबा गोपाळेगुरूजी  मावळ तालुका  अध्यक्ष एकनाथ गाडे   उद्योजक  सचिव आवटे  महेश कुडले  आदी पदाधिकार्यानी  वडगाव मावळ  व पुणे येथील तज्ञ कायदे सल्लागार  यांचेशी सल्ला मसलत  करुन   उच्च  न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
      राज्यात  शेती ला जोडधंदा म्हणुन  म्हणून   दहा  लाख  शेतकरी  पोल्ट्री  व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायातुन  अनेक  सुशिक्षित  तरूणांना रोजगार   उपलब्ध  तर झालेले आहेच  शिवाय   अनेकांनाही रोजगार उपलब्ध करून  दिले आहे. याशिवाय   या उद्योजकांकडुन  नापिक   व पडिक  जमिनी  वापरात  आणल्या  आहेत.

error: Content is protected !!