टाकवे बुद्रुक:
बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या ब्रीदवाक्यांचे बॅनर घेत गावातून स्वच्छता, अहिंसा तसेच जय जवान जय किसान चे नारे देत प्रभात फेरी काढली.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या वेशभूषा केल्या.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दर शास्त्री यांच्या जीवनावरील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले, उपाध्यक्ष मनोज जैन, संस्थापक सचिव रामदास वाडेकर, खजिनदार तानाजी असवले भूषण आसवले, पांडुरंग मोढवे ,स्वामी जगताप, राज खांडभोर, सोमनाथ आसवले उपस्थित होते. प्राचार्य राज कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
उपमुख्याध्यापिका प्रियांका कुडे , अविनाश जाधव, रुपाली जाधव ,कांचन जाचक, ऐश्वर्या मालपोटे, पूजा कालेकर, नेहा असवले, वनिता भगत ,स्नेहा जगताप शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.