वडगाव मावळ:
कान्हे ता.मावळ येथे महिंद्रा कंपनी CSR उपक्रमातून जनरल ड्युटी असिस्टंट(नर्सिग) कोर्सच्या दुसऱ्या बॅचचे उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला माफोई फाऊंडेशन चेन्नई व अथर्व विजय येवले सोशल फाऊंडेशन मावळ यांच्या संयुक्त विदयमाने राबविला जाणार आहे.
यामध्ये ५७ महिलांनी या कोर्स साठी नावनोंदणी करून सहभाग घेतला . टाकवे व कान्हे बॅच येथिल एकूण १०५  महिला व मुलीना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध होणार आहे.महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मिती असे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत कंपनीचे पदाधिकारी सुहास भातखंडे साहेब,शिवाजी झणझणे सुरेंद्र नेवास्कर, रोहित तिकोणे, डाॅ.गौरी इलाबादकर हे होते,कान्हे गावचे सरपंच  विजय सातकर , ग्रामसेवक शिंदे  यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
कान्हे बॅच प्रशिक्षक डाॅ. सीमा शिंदे यांनी सदर प्रशिक्षणाचे महत्व सांगीतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया येवले  यांनी केले .उपक्रमांविषयी माहिती व्यंकटेश राव  यांनी दिली.पाहुण्यांचा परिचय विजय येवले यांनी करून दिला.विद्यार्थिनीनी मनोगत व्यक्त करून सर्वाचे आभार मानले.

error: Content is protected !!