पिंपरी:
पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियानात
संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर,स्वामी प्रोअॕक्टीव्ह अॕबॕकस वाल्हेकरवाडी,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांनी पुढाकार घेतला आहे.
या सर्वाच्या संयुक्त विद्यमाने गुरुव्दारा परिसर आणि गणेश काॕलनी,नंदनवन सोसायटी,सप्तश्रुंगी सोसायटी मधील नागरिकांना पर्यावरणपुरक गणेशोत्सव  साजरा करावा यामध्ये सजावटीसाठी प्लॕस्टीकचा वापर टाळा,थर्माकोलचा वापर टाळा,प्लॕस्टर आॕफ पॕरिसच्या मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत अशा मुर्ती घेऊ नका,शक्यतो शाडू मातीच्याच मुर्ती बसवाव्यात,गणेशमुर्ती लहान आकाराची घ्यावी.गणपती विसर्जन घरच्याघरी करावे कापडी पिशवीचा वापर करा,गणपतीदान उपक्रमात सहभाग घ्यावा असे आव्हान करण्यात आले.
यावेळी पर्यावरणाचे महत्त्व संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड यांनी सांगितले. या अभियानाचे संयोजन डॉ.मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भानुप्रिया  पाटील,विकास पाटील, शब्बीर मुजावर,आनंद पाथरे,मनोहर कड,भरत शिंदे,ओम पाथरे,पल्लवी नायक,स्वामी पाटील यांनी केले होते.परिसरातुन ३०० नागरिकांनी संस्कार प्रतिष्ठानच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!