कान्हेत हाॅटेल नाविन्या रेस्टॉरंटचे उद्घाटन
नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली सातकर यांचा सत्कार
वडगाव मावळ:
कान्हे नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सोनाली नवनाथ सातकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सातकर परिवाराने नव्याने सुरू केलेल्या हाॅटेल नाविन्या रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद बुट्टे,भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,भाजपचे प्रभारी भास्कर म्हाळसकर,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी,पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे,
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,उपसभापती शांताराम कदम,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली शिंदे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अविनाश बवरे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे,पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी,पोटोबा देवस्थानचे सचिव अनंता कुडे,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी,राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पैलवान सावरी सातकर,पैलवान युवराज पंडीत सातकर ,सीए स्नेहल राक्षे ,उपसरपंच कल्पना काकरे, पांडूरंग गरूड
यांचा विशेष सत्कार करण्यात आला.श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज यांच्या प्रस्तावित मंदिरासाठी २५ हजार रूपये देणगी आली. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली सातकर यांचा सत्कार करण्यात आला.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले,” सातकर कुटूबियांची सामाजिक बांधिलकी सर्वश्रुत आहे. राजकारण आणि समाजकारणाला त्यांनी व्यवसायाची जोड दिली. उद्योग व्यवसायात सातकर परिवाराने घेतलेली गरूडक्षेप कौतुकास्पद आहे. तरूणांनी उद्योग व्यवसायाची कास धरावी.
आमदार सुनिल शेळके शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले,” नाविन्या हाॅटेल च्या अनेक शाखांचा विस्तार व्हावा,शेतकरी पुत्रांनी उद्योग व्यवसायात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. मावळ तालुक्यातील तरूणांनी उद्योग व्यवसायाची कास धरीत आपले कर्तृत्व सिद्ध करावे.
पुणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी,भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,जिल्हा नियोजन चे सदस्य अविनाश बवरे यांनी सातकर कुटूबियांचे अभिनंदन करीत शुभेच्छा व्यक्त केले.
उद्योजक देवराम सातकर,माजी सरपंच नंदा सातकर,गबाजी सातकर, विशाल सातकर,नवनाथ सातकर, संतोष सातकर,रघुनाथ सातकर, वरसू सातकर,भरत सातकर,संजय सातकर,बाळासाहेब सातकर, पंडीत सातकर, तुषार सातकर यांनी स्वागत केले.अतुल सातकर यांनी सुत्रसंचालन केले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम