राज्य सरकारचा सकल मराठा दिघी ग्रामस्थांच्या वतीने निषेध
प्रतिनिधी श्रावणी कामत
पिंपरी:
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे प्रतिनिधी उपोषण करत होते. या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी लाठीमार करीत हवेत गोळीबार केला.

या घटनेचा पिंपरी चिंचवड शहरात सर्व प्रथम दिघी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. मराठा समाजाचे शांततापूर्ण सुरू असलेले हे उपोषण पोलीसांनी अमानुष पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

याचा निषेध करण्यासाठी दिघी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौकात शनिवारी सकाळी भर पावसातात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘एक मराठा लाख मराठा’; ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’; मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी संतोष तानाजी वाळके, कृष्णाभाऊ वाळके, सागर रहाणे, निलेश जोगदंड, बापू परांडे,
केशव वाघमारे, गुलाबराव पाटील, अरविंद गोरे, धीरज खांडवे, श्रीमंत गजधने, कैलास तापकीर, संतोष जाधव, कैलास बोरसे, शाम परदेशी, के. के. जगताप, सुनील काकडे, प्रशांत काकेल, किशोर ववले, प्रवीण भोसले, बबन पारधी, हरिभाऊ लबडे, नंदकुमार तळेकर, आबा सुंडके, संदीप सांगुळे, आप्पासाहेब खोत, दत्ता घुले उपस्थित होते.

error: Content is protected !!