संस्कारची रक्षाबंधन भारतीय सैनिकांसमवेत
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सन २०१९ पासुन भारत पाकिस्तानच्या अमृतसर येथील आटारी सिमेवर रक्षाबंधन सन साजरा केला जातो.

हि तयारी मागील ४ महिन्यापासून चालु होती.आज बुधवार दि ३०/८/२०२३ रोजी संस्थेच्या ७८ महिलांनी भारतीय सैनिकांना राख्या बांधुन सन साजरा केला.यामध्ये एकूण ९४ सभासदांनी सहभाग घेतला होता.यांचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर कड,प्रिया पुजारी सायली सुर्वे आनंद पुजारी भानूप्रिया पाटील,रेवती जरग आनंद पाथरे यांनी केली होते.

बी एस एफ आॕफिस अमृतसर आणि बी एसएफ आॕफिस जांलंधर यांनी मोलाचे सहकार्य केले.परेड पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा आनंद द्विगुणीत व्हावा म्हणुन संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने १० भारतीय ध्वज बी एस एफ आटारी यांना भेट देण्यात आले.

error: Content is protected !!