वडगाव  मावळ:
मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव मावळ पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना  राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला .

आपण सर्व जण घरी बसून आपल्या कुटुंबाबरोबर सण उत्सव साजरे करत असतो .पण आपले पोलिस बांधव मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत असतात, आपले सण उत्सव त्यांना साजरा करता येत नाही. त्यांनाही सण साजरे करता यावेत तसेच त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील पवित्र सण मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी पोलिस निरीक्षक  कुमार कदम , पोलिस अंमलदार सुनिल मगर, श्रीशल्य कंटोळी , सुपे , भाऊसाहेब खाडे आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, माडी नगरसेविका पूनम जाधव, कविता मोरे, अमृता कांबळे, भारती शिरसाठ या  संचालिका उपस्थित होत्या.

error: Content is protected !!