पुणे:
पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी समीर बाबूराव चांदेरे यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचे चिरंजीव तथा पार्थ अजित पवार यांचे अतिशय जवळचे म्हणून समीर यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी समीर चांदेरे यांची निवड केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी माजी नगरसेवक दीपक मानकर यांची पुणे शहर अध्यक्षपदी निवड केली होती. पुणे शहर युवक अध्यक्षपद हे अतिशय महत्वाचे पद मानले जाते. समीर चांदेरे यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. या कामाची दखल तटकरे यांनी घेतली आहे.
यावेळी शहराध्यक्ष दिपक मानकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, बंडू केमसे, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, बाळासाहेब बोडके, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, सुषमा निम्हण यांच्यासह अन्य मान्यवर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
समीर चांदेरे यांना राजकीय वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत समीर काम करीत आहे. कोरोना काळात संपूर्ण कुटुंब कोरोना बाधीत असताना त्या गोष्टीची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीला ते धावून गेले होते. करोनाच्या काळात गोर-गरीब नागरिकांना रेशन धान्य वाटप, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे अशा अनेक अडचणींत त्यांनी नागरिकांना मदत केली.
पिण्याचे पाणी, वीज, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी ते रस्त्यावर उतरल, अशा युवकाला मागील दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली नाही, याची खंत पुणे शहरातील अनेक युवक कार्यकर्त्यांमध्ये होती,ही खंत आता दूर झाली असून समीर अधिक नेटाने पक्ष संघटनेचे काम करतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम