मावळ तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार सुनील शेळके
पवनानगर :
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांची पवनमावळ पूर्व भागातील जनतेच्या समस्या आणि विविध विकास कामांबाबतीत आढावा बैठक आज  शांताई मंगल कार्यालय पवनानगर येथे पार पडली. यावेळी परिसरातील ३० ते ४० गांवातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या गावातील सरपंच, उपसरपंच यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे विकास कामाचा लेखाजोखा मांडला. गावामध्ये रस्ता, वीज, पाणी,शाळा नवीन इमारत, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी व निवारा शेड, गावांमध्ये बंदिस्त गटार, मंदिर, सभामंडप अशा विविध समस्या व्यथित केले
यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः प्रत्येक गावनिहाय विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना शेळके म्हणले की,तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात प्रत्येक गावाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार आहोत तळागाळापर्यंत विकास कामे पोहचविली जातील तसेच तरुण पिढीने व्यवसायाकडे भर द्यावा. व्यवसायासाठी लागणारे सहकार्य मी करेल असे आश्वासन यावेळी शेळके यांनी दिले.

या बैठकीमध्ये नागरिकांच्या समस्या, नवीन प्रकल्प,  अर्धवट विकासकामे तसेच धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे अशा अनेक प्रकारच्या चर्चा नागरिकांसोबत करण्यात आली
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले,महादु कालेकर, नामदेव ठुले,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, नंदु धनवे, रविकांत रसाळ, साहेबराव कारके, किशोर सातकर, चंद्रकांत दहिभाते, मारुती काळे,करूंजचे सरपंच सदाशिव शेंडगे सुवर्णा राऊत,  हनुमंत गोणते,माऊली निंबळे यांच्यासह अनेक गावातील सरपंच,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहोळ यांनी केले .

error: Content is protected !!