साळुंब्रेत स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण
सोमाटणे:
साळूंब्रे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभातफेरी,ध्वजवंदन झाले. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आभिवादन करण्यात आले.केंद्र शासनाच्या महत्वकाक्षी अभियान “मेरी मिट्टी मेरा देश”(मिट्टी को नमन विरो को वदंन )या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम झाले.

लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ,पदाधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स उपस्थितीत होते. शिला फलकावर आझादी का अमृतमहोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हिजन २०४७ संदेशाचा  शिलाफलक ग्रामपंचायतीत उभारण्यात आला.व त्याचे अनावरण करण्यात आले.

वसुधा वंदन उपक्रमांतर्गत महानराष्ट्र डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलेश राक्षे  यांच्या मार्फत ७५  देशी वृक्षाच्या रोपाची लागवड करून वसुधा वंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. गावातील ग्रामस्थ पदाधिकारी, सर्व शासकीय कर्मचारी यांनी हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेतली.

कार्यक्रमास पोलीस पाटील आरती भंडलकर, कमलेश राक्षे, रविंद्र  विधाटे, नंदकुमार आगळे, भारत आगळे ,अंगणवाडी सेविका मनिषा आगळे,अशोक अनंतराव राक्षे, दत्तात्रेय निवृत्ती विधाटे,संजय जाधव,संदीप कड,जालिंदर कडेकर,रंगराव पाटील,प्रदीप आगळे आदि  मान्यवर उपस्थित होते.

गावातील शिक्षक वर्ग, विध्यार्थी,अंगणवाडी  शिक्षिका यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. ग्रामसेविका स्वाती गोसावी व ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर गायकवाड, विशाल विधाटे यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!