सांगिसे येथील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कामशेत:
सांगिसे ता.मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालय सांगिसे या विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सरपंच बबनराव टाकळकर यांच्या शुभहस्ते झाले . ध्वजपूजन माजी उपसरपंच ज्ञानेश्वर (माऊली) भांगरे व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजू शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस पाटील विजय गरूड हे होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात उत्साहाने सहभागी होवून देशभक्तीपर गीते,समूहगीते सादर करून वातावरणात मंत्रमुग्ध केले.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगतेही व्यक्त केले.
कार्यक्रमास चंदाताई पिंगळे, शशिकांत शिंदे,बाळु गरूड, ग्रामस्थ,पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड सचिव लहू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापिका सुनिता वंजारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंबादास गर्जे यांनी केले. आभार अनिल शिंदे यांनी मानले.
खाऊचे वाटप राजूभाऊ शिंदे,कालेकर बंधू, बबनराव टाकळकर,संदेश ढवळे, शशिकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर अरनाळे,सविता शिंदे,दशरथ ढोरे, अमोल आल्हाट, दत्तात्रय साबळे,विशाल टाकळकर,स्वप्नाली टाकळकर,मनाली टाकळकर,प्रदीप टाकळकर यांनी परिश्रम घेतले.
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे