वडगाव मावळ:
धामणे तील जिल्हा परिषद शाळेचा पाचवी इयत्तेतील शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल ९२ टक्के लागला आहे.या शाळेतील एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत,पाच विद्यार्थ्यांना २००  पेक्षा जादा गुण, बारा.विद्यार्थी पात्र झाले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत माऊली गणेश गराडे हा विद्यार्थी २४०  गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये आला आहे. शाळेतील इयत्ता पाचवीतील १३  विद्यार्थी परीक्षेत बसले होते .त्यातील बारा विद्यार्थी पात्र झाले ,शाळेचा एकूण निकाल 92% लागलेला आहे .

शाळेची गुणवत्ता यामुळे नक्कीच वाढलेली आहे.शुभांगी किशोर क्षीरसागर  यांनी मुलांना विशेष मार्गदर्शन केले.  शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख  पोपटराव  चौगुले व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचे, मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. तसेच मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म सुदाम वाळुंज यांच्या प्रेरणेतून व शाळा व्यवस्थापन समिती धामणे, यांच्या सहकार्यातून शाळेला एवढे  यश मिळाले.

error: Content is protected !!