तळेगाव स्टेशन:
निवडणुकीत मतदान प्रक्रियेचे महत्व अधोरेखित आहे,नव मतदारांनी मतदान नोंदवून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले. येथील प्लोरासिटी सहकारी गृहरचना सोसायटीतील नव मतदार नोंदणीच्या उदघाटन प्रसंगी तहसीलदार देशमुख बोलत होते.
भारत निवडणूक आयोग यांचेकडील निर्देशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे आदेशानुसार सोसायटीतील मतदारांसाठी मतदार नोंदणी शिबिर आयोजित केले होते .
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, महसूल सहाय्यक उत्तम लोंढे, गावकामगार तलाठी कविता मोहम्मारे ,व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, फ्लोरासिटी गृहरचना सोसायटीचे अध्यक्ष सत्यम खांडगे तसेच फ्लोरासिटी सोसायटीतील सदस्य उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार देशमुख यांनी या मोहिमे बाबत मार्गदर्शन केले .आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सदर मोहीम किती महत्त्वाचे आहे याबाबत महत्व पटवून दिले. सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे असे आवाहनही देशमुख यांनी केले.