टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ फळणेच्या श्रुती संजय मालपोटे या तरूणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे,तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्रुतीचे अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवर तिच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देत आहे. शेतकरी कुटूबियांतील श्रुतीने मिळवलेले यश इतर विद्यार्थांना प्रेरणादायी ठरेल.

मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर पायथ्याला असलेल्या लहानशा  गावातील श्रुती संजय  मालपोटे ही विद्यार्थिनी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली असून राज्यात मुलींमध्ये तिचा तिसरा क्रमांक आला आहे.

या परीक्षेत श्रुतीला ५४० पैकी ४०४.५० टक्के गण मिळाले आहेत. या परिक्षे अंतर्गत निवड होणारी श्रुती मालपोटे ही फळणे गावातील पहिली आहे,तिला महिला  पोलिस  अधिकारी होण्याचा तिने मान मिळवला आहे.

श्रुतीचे वडील संजय मालपोटे शेतीसह  पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत.  आजोबा बंडोबा मालपोटे हे ज्येष्ठ नेते असून
श्रीसंत  तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळाचे  उपाध्यक्ष आहेत.

  श्रुतीने पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळणेत घेतले.  पाचवी ते दहावी न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बुद्रुक येथे शिक्षण झाले. ज्युनिअर कॉलेज व्हीपीएस कॉलेज लोणावळा तर पदवीचे शिक्षण प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी येथे झाले.संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून घेतलेल्या श्रुतीने जिद्द ,चिकाटी, अभ्यासातील सातत्य या जोरावर हे यश मिळवले.

error: Content is protected !!