तळेगाव दाभाडे:
मावळातील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ,कै.ॲड कु. शलाका संतोष खांडगे चारिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा होणार आहे.
कै.ॲड.कु.शलाका संतोष खांडगे यांचे स्मरणार्थ मावळ तालुक्यातील एस.एस. सी .परीक्षा २०२२-२३ मराठी माध्यमांच्या प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा व १०० टक्के निकाल लागलेल्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक ९.७.२०२३ रोजी सकाळी १० वाजता रिक्रेएशन हाॅल जनरल हॉस्पिटल तळेगाव स्टेशन येथे पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव श्री संतोष खांडगे व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.
मावळ तालुक्यातील प्रत्येक शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळचे अध्यक्ष लक्ष्मण मखर, कै. ॲड.कु. शलाका संतोष खांडगे चारिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष अजिंक्य खांडगे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. राहूल खळदे यांनी केले आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस