महाकवी कालिदास दिन नवीन समर्थ विद्यालयात साजरा
तळेगाव स्टेशन:
महाकवी कालिदास दिन नवीन समर्थ विद्यालयात साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढ महिन्यातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून संपूर्ण भारत भर साजरा केला जातो.
नवीन समर्थ विद्यालयात महाकवी कालिदास दिन अर्थात आषाढस्य प्रथम दिने साजरा करण्यात आला. नवीन समर्थ विद्यालय व जूनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या वासंती काळोखे ,पर्यवेक्षक रेवप्पा शितोळे यांच्या शुभहस्ते महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रभा काळे यांनी केले .यावेळी विद्यालयातील साक्षी गायकवाड , योगिता थडके, वैश्नवी पाडांगळे या विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदास यांच्या विषयी माहिती सांगितली .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या प्राचार्या म्हणाल्या ,” संस्कृत भाषेतील बहुमूल्य ज्ञान ग्रहण करण्यासाठी संस्कृत भाषेचे अध्ययन क्रमप्राप्त ठरते .संपूर्ण भारत विश्वाला ज्ञानाचे वैश्विक भांडार संस्कृत भाषेच्या माध्यमातून भारत वर्षांनी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचा आपण सर्वांनीच लाभ घेतला पाहिजे.
उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयातील शिक्षक प्रतिनिधी शारदा वाघमारे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन