साते:
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची जन्मभूमी असणाऱ्या ऐतिहासिक साते गाव येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही साते येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले पुरंदर वरून अग्निज्योत आणण्यात आली, ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात अग्निज्वाला चे आणि सर्व युवक आणि युवतींचे स्वागत केले.
प्रत्यकाने घरांवर भगवा झेंडा लावला होता. संपूर्ण गावात ज्योत प्रदक्षिणा करण्यात आली नंतर ज्योत पूजन आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडपसमोर भव्य रांगोळी काढण्यात आली, सायंकाळीं मर्दानी खेळ आयोजन करण्यात आले होते.
ढोल ताशा च्या गजरात पारंपरिक पालखी सजवून शंभु महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याची पालखी मध्ये मिरवणूक काढण्यात आली, सर्व युवक आणि युवतींनी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती त्यात विशेष रथामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर श्री संभाजी महाराज यांची वेशभूषा आकर्षक ठरत होती..
त्या सोबत गावातील लहान मुले आणि युवतींनी लाठी काठी प्रात्यक्षिक सादर केले, शिवशंभू यांच्या घोषणाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले. नुकत्याच लोकार्पण झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक समोर विविध मर्दानी कला सादर झाली. श्रीमान रायगडावरील होळीच्या माळावरील होणारा मर्दानी खेळाचे स्वरूप गावकऱ्यांनी अनुभवले..
संध्याकाळी सरसेनापती हंबीरराव मोहिते हा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक कार्यक्रमाला उपस्थीत होते. मोठया उत्साहात आणि आनंदात शंभु जयंती सोहळा संपूर्ण झाला.
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची आमदार शेळकेंवर तीव्र टीका
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी