“अवघा रंग एक झाला पांडुरंग”
“रंगी रंगला श्रीरंग”
✅ दैन्य दुःख आम्हा न येती जवळी।👏
दहन हे होळी होती दोष।।
सर्व सुख येती माने लोटांगणी।।
कोण आणि त्यासी दृष्टी पुढे।।
ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातले, सुंदर असा मानवदेह दिला, अमोल अशी ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये दिली, अद्भुत बुध्दी व स्मरणशक्ती दिली आणि
✅आपल्याला विश्वाच्या मंडपात “रंगपंचमीचा उत्सव” नित्य साजरा करण्यासाठी पंचमहाभूतांच्या पांच रंगानी भरलेली देहाची पिचकारी दिली, त्या भगवंताचे नित्य स्मरण करणे, त्याच्या नामाचे आवडीने संकीर्तन करणे, हाच खरा धर्म-स्वधर्म होय. या धर्माचे पालन, नामस्मरण करणाऱ्या नामधारकाच्या हातून आपोआप घडते.
दिव्य नामाच्या उच्चाराने साधकाच्या चित्तावर भगवत् प्रेमाचे ठसे उमटले जातात, ते हळूहळू अंतर्मुख होते, त्यावर सांठलेला मळ नाहीसा होतो व भगवंताच्या चरणाचा स्पर्श होऊन त्या चित्ताचे चैतन्यात रूपांतर होते. चित्ताचे चैतन्य झालेल्या साधकाला सर्वत्र हरीच भरून राहिलेला आहे, असा अनुभव प्राप्त होता व परमात्मा जगरूपाने चैतन्याची शोभा शोभवून राहिलेला आहे, असे प्रत्यक्ष दिसू लागते. *जेथे देखे तेथे तुझीच पाऊले।* *त्रिभुवन संचले विठ्ठला गा।।* *एका जनार्दनी एकपणे उभा।* *चैतन्याची शोभा शोभवीत।।*
असा आपला अनुभव संत व्यक्त करितात. *-- सद्गुरू श्री वामनराव पै* *🙏सद्गुरूंच्या प्रबोधनातून🙏* *✍️(sp)1068*