पवनानगर : श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवली येथील माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शिवली येथे सन २००८-०९ ह्या वर्षात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या माजी विध्यार्थीनी स्नेहमेळावा घेतला. कार्यक्रमाची राष्ट्गीताने सुरवात झाली आणि सरस्वती चे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली. मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.सन २००८-०९ मध्ये दहावीतून बाहेर पडल्यानंतर अनेकजण प्रथमच भेटत होते. एकमेकांची ते आस्थेने व अपुलकीने चौकशी करत होते. व्यासपीठावर जाऊन स्वताच्या कार्याचा परिचय करून देत होते.शिक्षक , व्यवसाईक , प्रगतशील शेतकरी व राजकीय क्षेत्रात असलेले चेहेरे फार वर्षांनी एकत्र आले होते.
ह्यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी अमित ठाकर, रविंद्र आडकर, अजय गायकवाड, शरद येवले,संपत आडकर,राजेंद्र आडकर, विनायक आडकर, नितीन आडकर, वैभव घारे,सुनील आडकर,विक्रम जाधव,उमेश आडकर,सिमा आडकर,शुभांगी आडकर,निलम,शेडगे,योगिता येवले,स्वाती लोहोर,यांनी शाळेत शिक्षण घेत असताना केलेल्या दंगा मस्तीच्या आठवणीना उजळा दिला.शिक्षकांचे सत्कार करून शाळेला व शिक्षकांना सन्मानचिन्ह देण्यात आले. विध्यार्थ्यानी जुन्या आठवनीना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.विध्यार्थ्यांच्या हातून आई-वडिलांची व देशाची सेवा घडली पाहिजे व प्रत्तेकाने उत्तरो-उत्तर प्रगती करत राहिले पाहिजे आणि सर्वांच्या प्रयत्नातून शाळेला सहकार्यचा प्रतिसाद मिळावा व सार्वजन सातत्याने भेटत राहावे यास्वरूपाचे मार्गदर्शन करण्यात आले. असे मत अमित विजय ठाकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय गायकवाड यांनी केले.तर प्रास्ताविक अमित ठाकर यांनी केले.तर आभार रविंद्र आडकर यांनी आभार व्यक्त केले.पसायदानाने कार्यक्रमाची समाप्ती केली. (शब्दांकन-सचिन ठाकर,पवनानगर)
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस