सोमाटणे :
पिंपरी चिंचवड भोसरी आयएमए तर्फे– “गोडुंबरे तालुका मावळ” येथे वाचन संस्कृती वाढवणाऱ्या लायब्ररी सह  आरोग्य निदान शिबिर संपन्न झाले.

आधुनिक काळात ग्रामीण दैनंदिन जीवनातही  अमुलाग्र बदल करायचा असेल तर वाचन अत्यंत आवश्यक आहे! असे प्रतिपादन भारतीय वैद्यकीय असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेचे विद्यमान  अध्यक्ष प्रसिद्ध  नेत्रतज्ञ डॉक्टर सुशील मुथियान यांनी केले.

डाॅ.मुथियान सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते! गोडुंबरे तालुका मावळ येथे आय एम ए च्या पीसीबी शाखेने एक लाख २५  हजारची  अभ्यासू  वाचकप्रिय पुस्तके- लायब्ररीचे नूतरणीकरण आणि फर्निचर यासाठी एक लाख ७५  हजार रुपये खर्च करून या लायब्ररीतील आपला सहभाग नोंदवला.

ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे व गोडुंबरे ग्रामपंचायत   यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घघाटन पिंपरी चिंचवड भोसरी आय एम ए चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप कामत यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी पिंपरी चिंचवड भोसरी येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर टोणगावकर , डॉक्टर बुरुटे , माजी अध्यक्ष डॉक्टर दाते , तळेगाव येथील डॉक्टर शालिग्राम भंडारी असे एकूण वैद्यकीय क्षेत्रातील 35 मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद , छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यावर संस्कार  केलेत त्यामुळे इतिहास घडविणाऱ्या महान व्यक्ती घडल्या! अशाच प्रकारच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ व महिला यांनीही वाचनालयातील पुस्तकांच्या माध्यमातून पुढील पिढीवर उत्तम संस्कार करण्याचे आवाहन वाचनालयाचे समन्वयक  व्यंकटराव भताने{ कार्यवाह प्रबोधिनी} यांनी केले.

डॉक्टर- व्यक्तीची शारीरिक स्थिती
सुधरवतात तर- पुस्तक ही व्यक्तीची मानसिक स्थिती बदलविण्यास मदत करतात असेही प्रतिपादन भताने सरांनी केले.

डॉक्टर कामत यांनी आयएमएची यावर्षीची संकल्पना आवो- गाव चले– या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली! वाचनाची काय गरज आहे? याविषयी त्यांनी आपले विचार  मांडले! या लायब्ररीतील वाचकांसाठी तळेगावचे ज्येष्ठ लेखक वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी स्वलिखित अशा १५ पुस्तकांचा संच या लायब्ररीस शुभेच्छा भेट म्हणून प्रदान करून खऱ्या अर्थाने या लायब्ररीचे उद्घघाटन करून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

सरपंच सौ निशा गणेश सावंत व त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.ग्रामपंचायत सदस्य गौरव चोरघे ,किरण सावंत , मा .सरपंच राम सावंत , सौ सुकन्या चोरघे ,उपसरपंच मिलिंद आगळे ,बबनराव सावंत ,शकुंतला कदम , ज्ञानेश्वर सावंत-शिवाजी सावंत! गणेश गोपाळ सावंत यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचे स्वागत केले.

ग्राम प्रबोधिनी विद्यालयातील मैथिली गणेश सावंत व ऋतुजा ताराचंद सावंत या दोन मुलींनी वाचनाविषयीचे गरज व महत्त्व मांडले! कार्यक्रमानंतर Godumbre गावातील बापदेव महिला बचत गटाच्या सदस्यांनी अभंग गायन सादर केले. उद्घघटनाच्या  कार्यक्रमाला आढले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सूर्यवंशी  , ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे अध्यापक श्री मुंडे सर- गणेश भताने  , श्री चंद्रशेखर पंडित , श्री विलास फड व मुख्याध्यापक श्री राजेंद्र लासुरकर उपस्थित होते.

तसेच जिल्हा परिषद शाळा godumbre येथील मुख्याध्यापक श्री आल्हाट सर उपस्थित होते! कार्यक्रमाच प्रस्ताविक श्री सतीश सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन निशाताई सावंत   यांनी केले! सार्वजनिक वाचनाच्या उद्घाटनानंतर गावातील जवळजवळ 175  ग्रामस्थ महिला , मुले यांची आरोग्य तपासणी व उपचार या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले.

डॉ अनिरुद्ध टोनगांवकर
डॉ विकास मंडलेचा
डॉ मिलिंद सोनवणे
डॉ मनीषा पाटील
प्राथमिक आरोग्य केंद्र अडले चे अधिकारी डॉ सुर्यवंशी व जिल्हा नेत्र चिकत्सक डॉ प्रकाश रोकडे या तज्ञ डॉक्टरांनी हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यास विशेष परिश्रम घेतलेत.

error: Content is protected !!