कान्हे:
श्री.छत्रपती शिवाजी विद्या मंदिरातील  विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्ती साठी  कापडी  पिशव्याचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब आॕफ तळेगाव एमआयडीसीने हा उपक्रम राबविला.

प्लॅस्टिकचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी हा उपक्रम नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे,इंद्रायणी विद्या मंदिर,श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांंच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला.

प्लॅस्टिकमुक्त गाव व शहर हा संकल्प करून   या उपक्रमा अंतर्गत कान्हे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर शाळा व ज्युनिअर काॕलेजमधील  २५० विद्यार्थ्यांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांंच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थी हे प्रभावी दूत आहेत. हे ओळखून रोटरी क्लब च्या माध्यमातून पिशव्या वाटप करताना  तज्ज्ञांची व्याख्याने, निबंध लेखन, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

कान्हे शाळेतील विद्यार्थांंना सुनिल खोलम,अंतोष मालपोटे सरपंच विजय सातकर यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करत प्लास्टिक मुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थांंना कापडी पिशव्या देण्यात आल्या.

यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक  राम कदमबांडे, सरपंच विजय सातकर तसेच माजी उपसरपंच मदन शेडगे, दिनकर सातकर, उद्योजक समीर सातकर ,रामदास सातकर माजी उपसरपंच भारतीताई सातकर आणि पालक यांंच्यासह शिक्षक,शिक्षेके-तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमनाथ साळुंके यांनी व  आभार शहाजी लाखे यांनी मानले.

error: Content is protected !!