तळेगाव दाभाडे:
नवलाखउंब्रेतील  चिंतामणी ग्रुपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन विरोधीपक्ष नेते अजित पवार व युवा नेते पार्थदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.रविवार दि. ३० एप्रिल ला दुपारी. १.३० वा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनिल शेळके आहे.

माजीमंत्री मदन बाफना,  माजी आमदार कृष्णराव भेगडे,माजी मंत्री  संजय (बाळा) भेगडे, जिल्हा बॅकचे संचालक माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  बापूसाहेब भेगडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,अशोक ऊर्फ अंकल भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी उपसभापती पै. चंद्रकांत सातकर,कृषी पशुसंवर्धन चे माजी सभापती बाबूराव वायकर, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,बबनराव भोंगाडे मा. सभापती बाजार समिती, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष  सचिन घोटकुले, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, माजी उपसभापती गणेश ढोरे, नगरसेवक किशोर भेगडे,माजी गटनेते साहेबराव कारके, राष्ट्रवादी युवकचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले , प्रवक्ते राज खांडभोर,सरपंच सविता रामदास बधाले, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस  रामदास वाडेकर उपस्थित राहणार आहे.

बधलवाडी रोड, तळेगाव एमआयडीसीजवळ, भारत पेट्रोल पंप जवळ हा कार्यक्रम होणार आहे, चिंतामणी ग्रुपच्या सर्व हितचिंतक,मान्यवर बंधू भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन विक्रम चिंतामण कदम,चिंतामणी ग्रुपचे एम.डी. सदस्य, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष, स्वामी समर्थ सेवा मंडळ व
‘संतोष चिंतामण कदम डायरेक्टर यांनी केले.

error: Content is protected !!