साळुंब्रेतील कमलेश प्रकाश राक्षे यांचा राजभवनात सन्मान
मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष:
ज्या वयात आईने… लाड करायचे…कौतुक करायचं..नेमक्या त्याच वयात… आई सोडून गेली..देवा घरी आई गेली…अन मायेचा ममतेचा झराच अटला….मात्र..वडिलांनी मायेची , ममता आणि पितृत्वाचा..धागा गुंफला..हाच धागा धरून तो लहानाचा मोठा झाला..त्याच्या बालपाणाचे कौतुक आई सोडून सा-या जगाने केले… त्यात आईचे आणि वडीलांच्या नात्यातले सगळेच आले…
हे आज आठवण्याचे कारण.. राजभवनात त्या तरूणाचा सन्मान करण्यात आला. तो करीत असलेल्या ‘ सामाजिक कार्याचा गौरव ‘ म्हणून त्याला सन्मानित करण्यात आले. आणि हा सन्मान स्विकारताना गतकाळ चलचित्रपटासारखा डोळया समोरून गेला.राजभवनात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
रमेश बैस,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि उपस्थित या तरूणाचा सत्कार झाला.
राज्यातील दिग्गजांकडून हा सन्मान स्वीकारणारा हा तरूण ही मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावचा कमलेश प्रकाश राक्षे. कमलेश राक्षे यांना गौरविण्यात आले ते त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून. कमलेश प्रकाश राक्षे हे महाराष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि कमलेश राक्षे राक्षे सोशल फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आहे. या दोन्ही सामाजिक संस्थाचे ते संस्थापक अध्यक्ष आहे. या दोन फाऊंडेशन सह अनेक सेवाभावी संस्था,संघटनेशी संबंधित असलेल्या कमलेश यांना जनसेवेचा वसा आणि वारसा आहे. त्यांनी यापूर्वी साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले आहे.
राजभवनातील हा पुरस्कार सोहळा राक्षे कुटुंबिय आणि नातेवाईकांनी याच देही याच डोळी अनुभवला. या आनंदाच्या क्षणांचे राक्षे कुटुंबिय साक्षीदार आहे.त्यांचा सन्मान सोहळा पाहताना वडिलांना गतकाळ आठवला आणि ते गतकाळात हरवून गेले. मावळ तालुक्याच्या पूर्वेला काळ्या आईची सेवा करणारे कृषीनिष्ठ गाव,किंबहुना कृषी संपन्न गाव म्हणजे साळुंब्रे. गावाला शेतीची आस…सर्व गावाची उपजीविका शेती वरच.शेती आणि दुग्धव्यवसायात गावकरी हरपून जात. काळया आईची सेवा रूजू करायला सारा गाव शेतात राबायचा.
या राबणा-या हातात कमलेशचे आजोबा सोपान तुकाराम राक्षे आणि आजी तुळसाबाई सोपान राक्षे यांचे हात होतेच. वडिलांनी पिढ्याजात शेतीला आपलेसे केले.तेही शेतात राबायचे.कष्टाची भाकरी फारच गोडधोड असायची.त्या भाकरीला त्यांनी इमानेइतबारे जोपासली. कमलेश ची आई शोभाताई यांनीही साथ दिली. पण अर्ध्यावर डाव मोडीत तिने जगाचा निरोप घेतला. ज्या वयात आईच्या मायेची भूक होती ती मायाच दूरवर गेली. पण वडिलांनी त्यांचे कर्तव्य बजावले. कमलेश शिकत होता.
कमलेशचे आजोबा सोपान तुकाराम राक्षे साळुंब्रे गावातील प्रगतशील शेतकरी.त्यांच्या शेतात सर्व काही पिकायचे. मीठ सोडले तर काही विकत घ्यावे लागत नसे. सर्व शेतात पिकल्याने गावात आणि पंचक्रोशीत राक्षे परिवाराचा दबदबा होता. शेतीला दुग्धव्यवसायाने साथ दिली. घरात दही दुधाचा रतीब होता. कुटूंबात सधनता असली तरी कमलेशला आई विणा परकेपणा सर्वाना जाणवता होताच. आईची माया कोणी देऊ शकत नसले तरी आईच्या शब्दांचा आधार कमलेश ला मिळाला,त्याच्या संगोपनाची जबाबदारी मामी श्रीमती मैनाबाई नारायण मु-हे यांनी स्वीकारली आणि पार पाडली.
कमलेशचे नववी पर्यंतचे शिक्षण ग्रामप्रबोधिनी शाळेत झाले तर दहावीचे शिक्षण किर्ती विद्यालयात झाले. दहावीचे शिक्षण झाले अन कमलेश नोकरी धरली. शेती केली.टाटा मोटर्स येथे नोकरी झाल्यावर ट्रॅव्हल्स व्यवसाय केल्या. या व्यवसायात शेती काम करताना आलेल्या वैयक्तिक अडचणी सोडताना इतरांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे असा मनाचा निश्चय करून कमलेशने सामाजिक कार्याला वाहून घेतले. शासनदरबारी काम करताना आलेले अनुभव आणि कामाच्या माहितीवर सर्वसामान्य जनतेची कामे सहजतेने करू लागला.
त्याने कित्येक कामे शासन दरबारी सहजतेने मार्गी लावली.शासनाच्या विविध लाभाच्या योजना लाभार्थ्यांना पोहचविण्यासाठी त्याने वेळ दिला आणि पदरमोड केली. कित्येक निराधारांना घरकुल योजना मिळवून दिल्या,संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. दिव्यांग बांधवाना मदत केली. या सगळया कामाची प्रचिती मावळ तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना आली. अनेक लाभार्थी या कामाबद्दल कमलेश यांचे कौतुक करीत आहे. या सगळ्या सामाजिक कामांची कायमच वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटनांनी दखल घेतली.आणि वेगवेगळे पुरस्कार कमलेश राक्षे यांना मिळाला.
राजभवनात अशाच सामाजिक कार्याची दखल घेत नवराष्ट्र व नवभारत माध्यम समूहाच्या वतीने कमलेश राक्षे यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र स्तंभ पुरस्कार मिळाला. राजभवनात राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह देशातील दिग्गज उद्योजक यांच्या उपस्थितीत झालेल्या सन्मान सोहळाला प्रकाश सोपान राक्षे, तेजस्वी कमलेश राक्षे, कैवल्य कमलेश राक्षे, अशोक आनंदराव राक्षे, प्रशांत विलास मु-हे उपस्थितीत होते.