अनुभूती आपल्यात दडलेल्या__ एका खुजा ची{ भाग 2}
असं हे मन– माझं दुसरं मन काही करू देईना पण पहिलं मन मात्र म्हणत होत की, अरे तो कसाही वागला तरी तू तुझ्या चांगुलपणान त्याला लाजव! या रणरणत्या उन्हात त्याला तुझ्या गाडीत घे व आपल्या गावात सोड म्हणजे आयुष्यभर तो तुला विसरणार नाही पण दुसरं मन मात्र काही ती कृती करायला तयार होईना! अशा द्विधा मनस्थितीत त्याला ओलांडून माझी गाडी दोन-तीन किलोमीटर पुढे केव्हा गेली मला कळलच नाही! मित्रांनो मी त्या वेळी भर उन्हात त्याला रस्त्यावर टाकून तसाच पुढे निघून गेलो याची खंत आजही मला वाटत आहे!
मित्रांनो हे सर्व घडून गेल्यानंतर मी मात्र विचार करायला लागलो की– प्रत्येकाच्या जीवनाच्या या प्रवासात आपण अशा कितीतरी चांगल्या गोष्टी ज्या आपल्याला करणे सहज शक्य होत्या, त्या करू शकलो नाहीत कारण आपल्यात दडलेला जो खुजा आहे तो आपल्या हातून चांगल्या गोष्टी योग्यवेळी करू देत नाही, हे कटू सत्य आपल्याला मान्य करावंच लागेल!
ज्यावेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात बस ने जाताना आपल्याला चांगली जागा मिळते. आपण पुण्यापर्यंत आरामात प्रवास करण्याचा अनुभव घेत असतो, अशावेळी पुढील स्टॉपवर एक म्हातारा आपल्या लटपटत्या पायाने बस मध्ये चढतो अथवा एक मूल कडेवर घेतलेली आई चढते. आपल्याला असं वाटतं की त्यापैकी एकाला तरी आपण जागा द्यावी पण पण बऱ्याच वेळी आपल्या हातून ती कृती होत नाही. या सारखच दुसर उदाहरण आपण घेऊया– या संघर्षमय स्पर्धेच्या धकाधकीच्या जीवनात रस्त्याने जाताना आपण अनेक अपघात बघतो, हळूच पुढे निघून जातो त्यामुळे सहाजिकच आपल्याला वाटतं की आपण याला मदत करावी, जवळच्या एखाद्या रुग्णालयात त्यांना भरती करावं पण आपल्या हातून ही कृती होतेच असं नाही कारण प्रत्येक व्यक्तीत दडलेला खूजा असतो, तो काही चांगली कृती आपल्या हातून घडू देत नाही!
मित्रांनो मंगेश पाडगावकर यांनी एकदा असं म्हटलं होतं की– मी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करून त्या गावाची तहान भागवू शकत नाही पण एका तहानलेल्या माणसाची तहान एका पेल्या भर पाण्याने निश्चितपणे भागवू शकतो, एवढी क्षमता मला परमेश्वर कृपेने लाभलेली आहे!
पण ही साधी कृती सुद्धा आपल्यात दडलेला खुजा आपल्याला करू देत नाही हीच खरी शोकांतिका आहे!
मित्रांनो प्रत्येकात दडलेल्या खुजाची त्याला जाणीव होणे हीच खरी परिपक्व व्यक्तिमत्वाच्या दिशेने त्याच्या प्रवासाची सुरुवात आहे! मी माझ्यात दडलेल्या खुजाची अनुभूती जशी अनुभवली तशीच ती आपल्यालाही प्राप्त व्हावी हीच त्या परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी थांबतो!
( शब्दांकन – ला. डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- टाकवे येथील मित्रांनी १८ वर्षांनी एकत्र येऊन थंडीत वाटले गोरगरिबांना स्वेटर
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा