वडगाव मावळ:
वडगांव नगरपंचायत हद्दीतील अधिकृत व अनधिकृत होर्डिंग्ज चे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका पुजा विशाल वहिले यांनी केली.
नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी यांना वहिले यांनी निवेदन देऊन ही मागणी केली आहे. वहिले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि.१८/४/२३ रोजी पिंपरी चिंचवड रावेत परिसरात व पाठीमागे देखील पुणे स्टेशन परिसरात होर्डिंग पडून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.
पिंपरी_चिंचवड रावेत परिसरात तशीच घटना घडली आहे. मुळातच व्यावसायिक हेतूने उभारण्यात येणाऱ्या या होर्डिंग्जचा दर्जा व मजबुतीची अधूनमधुन स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.जिथे अनधिकृत होर्डिंग्ज असतील त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. वडगांव शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे शहरातील मुख्य चौकात तळेगाव फाटा , वडगांव फाटा, तसेच हायवेच्या दुतर्फा आनेक होर्डिंग्ज ऊभी आहेत .
वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व होर्डिंग्ज चे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.जे होर्डिंग्ज उभी आहेत त्या पैकी किती अधिकृत व अनधिकृत आहेत याची पडताळणी करून अनाधिकृत होर्डिंग्ज उभ्या करणार्ऱ्या जाहिरात कंपनीवर व धोकादायक होर्डिंग्ज वर कारवाई करावी.
वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॅा प्रविण निकम ,नगराध्यक्ष मयूर ढोरे ,उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर याना निवेदन देणयात आले यावेळी नगरसेविका पुजा वहिले ,नगरसेवक राजेंद्र कुडे,मंगेश खैरे उपस्थितीत होते.